जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, (डायट) सांगली या संस्थेची ओळख करून देताना आनंद होत आहे . राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र , पुणे (विद्या प्राधिकरण) या शिखर संस्थेच्या सनियंत्रणाखाली व शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन, शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र पुणे , शिक्षण संचालनालय महाराष्ट्र पुणे ,एम पी एस पी मुंबई ,बालभारती पुणे, राज्य विज्ञान संस्था नागपूर, आंग्ल भाषा संस्था,छत्रपती संभाजीनगर, मिपा छत्रपती संभाजीनगर यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा स्तरावरील विविध शासकीय कार्यालयांच्या समन्वयाने व सहकार्याने मुलांचे शिक्षण अखंड चालू राहण्यासाठी शाळा, शिक्षक, पर्यवेक्षण यंत्रणा, पालक यांना विविध शासकीय योजना व वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त उपक्रमांच्या माध्यमातून मूलभूत मार्गदर्शन करण्याचे कार्य करत असते.